शक्तीशाली स्फोटाने सांगलीत एक ठार, तिघे जखमी

On: December 6, 2020 9:20 PM

सांगली : सांगली जिल्ह्याच्या तासगाव येथे जिलेटीन कांड्यांच्या भिषण स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दोन वाहने जळून खाक झाली आहेत.

तासगाव येथून काही अंतरावरील बस्तवडे गावात आज रविवार 6 डिसेंबरच्या दुपारी चार वाजता ही घटना घडली. डोंगर फोडण्याचे काम सुरु असतांना याकामी वापरण्यात येणा-या जिलेटीन कांड्याचा स्फोट झाला. डोंगर फोडून सपाटीकरणाचे काम होत असतांना ही भिषण घटना घडली. या स्फोटामुळे परिसरातील अनेक घरांना तडे गेले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्फोट झाला त्यावेळी प्रचंड प्रमाणात धुराचे लोळ उठल्याने स्फोट नेमका कुठे झाला याचा अंदाज कुणाला येत नव्हता. स्फोट झाला त्याठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकला देखील आग लागली. आग लागलेल्या ट्रकच्या जवळच उभ्या असलेल्या वाहनाला देखील आग लागली. एकुण दोन्ही वाहने आगीत खाक झाली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment