मुलीच्या विवाहाच्या दिवशीच आईचे निधन – चाळीसगाव येथील घटना

On: December 8, 2020 6:43 PM


जळगाव : चाळीसगाव येथील भोकरे परिवारात आज विवाह सोहळा होता. मात्र विवाहाच्या दिवशीच लग्नापुर्वी वधूच्या आईचे निधन झाल्याची दुख:द घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आपल्या कन्येचा विवाह सोहळा बघण्यापुर्वीच मातेने अखेरचा श्वास घेतला. एकीकडे मंगलमय वातावरण व त्यात निधनाची घटना अशा दुहेरी पेचात भोकरे परिवार सापडला.

संगिता राजेंद्र भोकरे (50) असे निधन झालेल्या शिक्षीकेचे नाव असून त्यांची मुलगी मयुरी हिचा आज विवाह होता. विवाह सोहळा पुर्ण होण्यापुर्वीच संगिता भोकरे यांची मृत्युशी गाठ पडली. त्यामुळे दुपारीच मयुरी हिचा विवाह सोहळा साध्या पद्धतीने आटोपून सायंकाळी संगिता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संगीता राजेंद्र भोकरे या तरवाडे जि.प.शाळेत शिक्षीका होत्या. त्यांचे पती राजेंद्र भोकरे हे उमरखेड (भडगाव) येथे शिक्षक आहेत. संगिता या कर्करोगाने पिडीत होत्या. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment