जळगाव : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 22 डिसेंबरपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) आणि (3) जारी करण्यात आले आहे तरी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. .
या कालावधीत पाच अथव त्याहुन जास्त समुदाय जमा करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशनच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास अथवा मिरवणुका काढण्यास बंदी आहे. हा आदेश विवाह मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, अंत्ययात्रा यांना लागू नसल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी कळवले आहे.








