विभागीय लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

On: December 8, 2020 8:08 PM

जळगाव : सह सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील परिपत्रक क्रमांक संकीर्ण-1520/ प्र.क्र.24 /लोदिकक्ष, 23/11/20 च्या परिपत्रकानुसार कोविड-19 चा फैलावास प्रतिबंध करण्याकामी व विभागीय लोकशाही दिनाचे आयोजनाबाबत निर्देश देण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी, 14 डिसेंबर 2020 रोजी होणारा लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक यांनी कळवली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment