टीव्ही घेण्यासाठी तगादा,पत्नीने विष घेत केला आत्महत्येचा प्रयत्न

On: June 29, 2020 7:05 PM

नागपूर: अनेक दिवसांपासून पतीकडे टीव्ही साठी तगादा लावून देखील पती टीव्ही घेऊन देण्यास तयार नव्हता. त्यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या महिलेने स्वतःच्या दोन चिमुकल्यांना विष पाजले आणि स्वतःही विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला.
वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी सदर धक्कादायक घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मायलेकांवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment