जळगाव : जैन दर्शनात श्री तिलोक छंद संग्रहाचे एक अनन्यसाधारण महत्त्व सर्वशृत आहे. भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशन द्वारा मुद्रित व श्री जैन रत्न पुस्तकालय अहमदनगर यांच्याद्वारे प्रकाशित श्री तिलोक छंद संग्रहाचे प्रकाशन हस्ती हीरा नगर स्थित जैन भवन याठिकाणी युवाचार्य प्रवर परमपूज्य श्री महेन्द्रऋषीजी म. सा. आदि ठाना 5 तसेच महासती परमपूज्य मंगलज्योतिजी म. सा. आदी ठाना 3 यांच्या पावन उपस्थितीत आणि संघपति दलीचंदजी जैन, उद्योगपती अशोकभाऊ जैन, पूर्व महापौर प्रदीपभाई रायसोनी, नगरसेवक अमर जैन, नेमीचंद चोरड़िया, स्वरुप लुंकड, महावीर बोथरा, मनिष लुंकड व नितीन चोपडा यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा झाला.
याप्रसंगी संघ सेवाभाव, सहकार्यासाठी प्रदीपभाऊ रायसोनी व अशोकभाऊ जैन यांचा सत्कार सोहळा पार पडला. सदर पुस्तक धर्मप्रेमी परिवारात वितरीत केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
पूज्य गुरुदेव श्री यांनी श्री तिलोक छंद संग्रहाचे स्वाध्यायात महत्त्व यावेळी विषद केले. आचार्य सम्राट परमपूज्य श्री आनंदऋषीजी म. सा. यांच्या साधनेत हे जीवनपर्य़ंत समाहित होत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख यावेळी करण्यात आल. पुढे बोलतांना ते म्हणाले की, जळगाव श्री संघाची भारतवर्षमध्ये विशेष महानता टिकून आहे. मागील काळात श्रद्धेय भवरलालजी जैन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन, स्वर्ण व्यवसायी रतनलालजी बाफना तथा सेवादास दलिचंदजी जैन यांनी याकामी सातत्यता राखली आहे.
या सर्वांनी आपल्या निष्ठापूर्वक व्यहारासह सर्वसमावेशकतेने ही परंपरा प्रवाहित करण्यात आली. जैन भवन येथे झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात प्रशासनिक सूचनांचे पालन करत धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींची उल्लेखनीय उपस्थिती होती.