जळगाव : शहरातील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते बबलू (हर्षित) पिंपरिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्ञान योगवर्ग तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत हर्षित अॅंड कंपनी – 172 विसनजी नगर, ज्ञान योगवर्ग हॉल, पप्पू पेपर किंगच्या बाजुला या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. बबलू पिंपरीया यांच्या हयातीत त्यांनी सामाजीक कार्यात एक वेगळा ठसा निर्माण केला होता. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सामाजीक जाणीवेतून रक्तदानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गायींसाठी पाण्याच्या हौदाचे देखील अनावरण यावेळी करण्यात येणार आहे.
सध्या राज्यात एक दिवस पुरेल एवढ्याच प्रमाणात रक्त साठा शिल्लक आहे. कोवीडच्या पार्श्वभुमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर एक मोठे संकट उभे आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील नागरीकांना रक्तदान करण्याचे आवाहन यानिमीत्ताने करत आहेत.