मालवाहू ट्रक – गॅस टॅंकरची जबर धडक

जळगाव : महामार्गालगत टीव्ही टॉवर नजीक आज सकाळी भरधाव वेगातील मालवाहू ट्रकने पुढे असलेल्या गॅस टॅंकरला जोरदार धडक दिली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकची गॅस टॅंकरला धडक लागून गॅस टॅंकर उलटण्याची घटना आज सकाळी सात वाजता घडली. या धडकेत गॅस टॅंकर उलटला तसेच इंधन टाकी तुटल्याने त्यातील डीझेल रस्त्यावर पसरले.

इन्डेन कंपनीचे एलपीजी गॅस भरलेला टॅंकर (एमएच 18 बीजी 1525) हा चेंबूर येथून भुसावळच्या दिशेने जात होता. या गॅस टॅंकरवर सुरजकुंमार कमलेशकुंमार सरोज (24) रा. बेलसावना ता.लमुआ जिल्हा सुलतानपुर हा चालक होता.

त्यावेळी टॅंकरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मालवाहू ट्रकने (एमएच 18 बीएच 5355) पुढे असलेल्या गॅस टॅंकरला जोरदार धडक दिली. या जबर धडकेत ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. मागील ट्रक पुढील टॅंकरवर जावून आदळला. या धडकेमुळे गॅसने भरलेला टॅंकर रस्त्यावर उलटला व त्याची इंधन टाकी तुटली. त्यामुळे टाकीतील संपुर्ण डीझेल रस्त्यावर पसरले. ओव्हरटेक करणा-या ट्रक देखील कॅबीनपासून वेगळा झाला.

सुदैवाने या घटनेत गॅसने भरलेल्या टॅकरमधील वायू रस्त्यावर पसरला नाही, अन्यथा आगीची मोठी दुर्घटना झाली असती. याप्रकरणी गॅस टॅकर चालक सुरजकुमार कमलेशकुमार सरोज याने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here