पुणे : कौटुंबिक कलहातून चिडलेल्या पतीने पत्नीच्या कार्यालयात जावून तिचा धारदार चाकूने खुन केल्याचा प्रकार भर दुपारी कोथरुड परिसरातील डहाणूकर कॉलनीत घडला. किर्ती रविकुमार पोटे (43) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. तिचा खुन करणारा पती रविकुमार पोटे (50) रा. कोथरुड) हा खुन केल्यानंतर पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याच्याविरुद्ध अलंकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरुड परिसरात राहणा-या पोटे दाम्पत्याला एक मुलगी आहे. किर्ती पोटे या एका हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिष्ट म्हणून कामाला होत्या. गुरुवारी पती – पत्नीत कौटुंबिक कारणावरुन वाद झाले होते. या वादाच्या कारणावरुन चिडलेल्या रविकुमार पोटे याने पत्नी कामाला असलेला दवाखाना गाठला. तेथेच त्याने पत्नीचा धारदार चाकूने खुन केला. खुन केल्यानंतर तो तेथून पळून गेला. अलंकार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत.