जळगाव : मोबाईलवर बोलत बोलत पायी चालणा-या इसमाच्या हातातील मोबाईल मागून डबलसीट आलेल्या दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना आज दुपारी एमआयडीसी परिसरात घडली.
मुलाची तब्येत खराब असल्याचा निरोप आल्यामुळे कंपनीत काम करणारे कर्मचारी भुषण दिलीप पाटील हे कंपनीतून घराकडे पायी पायी जात होते. वाटेत ते मोबाईलवर पत्नीसोबत बोलत होते. तेवढ्यात मागून दोघे दुचाकीस्वार डबलसीट आले. त्यांतील कुणीतरी एकाने भुषण पाटील यांच्या पाठीवर मारुन हातातील मोबाईल हिसकावून नेला.
या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि.अमोल मोरे व त्यांचे सह्कारी रतीलाल पवार करत आहेत.