मुंबई : आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता चॅनलवरील कामगार सभा या कार्यक्रमात खान्देशचे सुपुत्र राजेंद्र वखरे यांची मुलाखत आज 11 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजता प्रसारीत होत आहे. सदर मुलाखतीचे पुन: प्रसारण दि.12 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे. सदर मुलाखत हर्षदा प्रभू यांनी घेतली आहे.
समाजसेवक राजेंद्र वखरे हे बेटावद बुद्रुक, ता. जामनेर, जि.जळगाव येथील मुळ रहिवासी असून डोंबिवली येथे स्थायिक झालेले आहेत. ते पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट व क्राईम बॉर्डर, क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) चे संस्थापक आहेत.
राजेंद्र वखरे यांची हर्षदा प्रभू यांनी घेतलेली मुलाखत दि. ११ डिसेंबर २०२० रोजी वेळ रात्री ९.३० वाजता कामगार सभा या कार्यक्रमांमध्ये प्रसारित होणार आहे.
या मुलाखती दरम्यान कामगार वर्ग व त्यांच्या समस्या तसेच त्यावरील उपाय योजना याबाबत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. राजेंद्र वखरे यांनी त्यांच्या संस्था व स्वयंसेवकांमार्फत कशाप्रकारे सामाजिक उपक्रम राबवले आहेत व भविष्यात राबवणार आहेत, तसेच कामगार व त्यांच्या परिवाराचा स्तर उंचावण्यासाठी सामाजिक व शैक्षणिक विषयावर सखोल चर्चा या मुलाखती दरम्यात करण्यात आली आहे.
समाजसेवक तथा पत्रकार राजेंद्र वखरे यांच्या सामाजिक कार्याची दखल आकाशवाणी मुंबई केंद्राने घेतली आहे. त्याबद्दल त्यांनी आकाशवाणी मुंबई केंद्राचे व त्यांच्या टीमचे आभार मानले आहे. सर्वांनी ही मुलाखत श्रवण करावी असे आवाहन राजेंद्र वखरे यांनी केले आहे. मुलाखत प्रसारण : दि.11 डिसेंबर रात्री – 9.30 (रेडियो- Newsonair- मोबाइल ऍप-वेबसाइट) पुनःप्रसारण : दि.12 डिसेंबर – वेळ – संध्याकाळी 4.00 वाजता (DTH- मोबाइल ऍप-वेबसाइट)