जैन पाईप्सच्या वापरातुन साकारले भवरलालजींचे अप्रतीम पोट्रेट

On: December 13, 2020 10:10 PM

जळगाव : श्रद्धेय मोठेभाऊ भवरलालजींच्या 83 व्या जयंतीच्या निमित्ताने कंपनीचे सहकारी प्रदीप भोसले यांनी त्यांची एक आगळीवेगळी अप्रतिम कलाकृती साकारली आहे. त्यांच्या या कलाकृतीला उत्तम प्रकारची दाद मिळत आहे.

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या 83 व्या जयंतीच्या निमीत्ताने जैन पाईपच्या सहाय्याने अनुभूती निवासी स्कूलच्या फूटबॉल मैदानावर 105 फूट लांब आणि 75 फूट रुंद असे एकुण 8 हजार चौरस फुट आकाराची विस्तृत मोझाईक आर्ट स्वरुपातील कलाकृती साकारण्यात आली आहे. भवरलालजी जैन यांचे हे पोट्रेट अतिशय कल्पकतेने जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी केवळ तिन दिवसात साकारण्यात यश मिळवले आहे. ही कलाकृती त्यांनी आपल्या 15 सहकाऱ्यांच्या मदतीने साकारली आहे. त्यांच्या या कलाकृतीचे कौतुक होत आहे.

सदर अप्रतिम कलाकृती साकारण्यासाठी प्लास्टिक पाईपाव्यतिरिक्त काळ्या, करड्या व पांढऱ्या रंगांच्या पाइपांचा योग्य रितीने वापर करण्यात आला आहे. जवळून पाहिल्यास ही कलाकृती केवळ पाइपांची मांडणी वाटते. मात्र उंचावरुन अथवा ड्रोणच्या सहाय्याने ही कलाकृती पाहिल्यास अत्यंत चांगल्या पद्धतीने दिसते. अनुभूती स्कूल परिसरातील सर्वात उंच टेकडीवरील महावीर पॉईंट येथून या कलाकृतीला पाहिल्यास अप्रतिम आनंद घेता येतो.

श्रद्धेय मोठ्याभाऊंकडून प्रेरणा मिळाल्याचे समाधान – प्रदीप भोसले
जैन इरिगेशनच्या सोलर आर अण्ड डी विभागाचे व्यवस्थापक प्रदीप भोसले एक कलाकार देखील आहेत. ‘मोठी स्वप्ने पाहिल्यावर आपल्या हातून मोठे काम होते,’ श्रद्धेय भाऊंच्या या एका सुविचाराने त्यांना जगातील सर्वात मोठी कलाकृती साकारण्याची ही मोठी प्रेरणा मिळाली आहे. रेषा, बिंदू, रंगसंगती हे चित्रकलेचे तंत्र वापरुन सर्वात मोठे मोझाईक आर्टमधील हे पोट्रेट साकार झाले असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.

कुठल्याही चांगल्या घडणाऱ्या गोष्टीला जैन परिवार नेहमीच प्रोत्साहन देत आला आहे. त्यामुळेच अशोकभाऊ जैन यांना ही संकल्पना आवडली. ती साकारण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन व मदत करण्यात आली. प्रशांत भारती, प्रकाश पाटील, अनिल पाटील, अजय काळे, सारंग जेऊरकर आणि संतोष पांडे यांच्यासह इतर 15 सहकाऱ्यांनी याकामी अथक परिश्रम घेतले आहे.

सदर भव्य कलाकृती या आठवड्यात त्याच परिसरातील महावीर पॉईंट येथून सकाळी 9 ते 5 या कालावधीत बघता येईल. भविष्यात ही कलाकृती स्थापित करण्याचे नियोजन असल्याचे अशोकभाऊ जैन यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment