जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा परिसरात दहशत माजवणारा बिबट्या वनविभागाच्या ताब्यात आला आहे. मध्यरात्री 12 च्या दरम्यान भार्डू ता.चोपडा परिसरात त्याला जेरबंद करण्यात आले.
बिबट्याने काहीतरी सेवन केले असेल अथवा तो कदाचीत आजारी असू शकतो. त्यामुळे तो एकाच जागी बसून होता. भार्डू आणि लहान हातेड परिसरातील नागरिकांच्या मदतीने वन विभागाच्या पथकाने त्याला जाळ्यात घेतले.
बिबट्या ताब्यात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. याकामी सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी व्ही. एच. पवार, चोपडा वनक्षेत्रपाल दत्तात्रय लोंढे, सत्रासेन आणि लासुर येथील वन कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. दिवसेंदिवस जंगल परिसर कमी होत असून वन्य प्राण्यांना अन्न पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे जंगलातील प्राणी नागरी वस्तीकडे वाटचाल करु लागले आहेत.