पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी स्विकारली अकोला जिल्हयाच्या पोलिस दलाची कमान

On: June 29, 2020 7:44 PM

अकोला: अकोला जिल्हयाचे नुतन पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस अधिक्षक पदाची सुत्रे स्विकारली असून मावळते पोलिस अधिक्षक अमोघ गावकर यांची अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस अधिक्षक पदी बदली झाली आहे. पोलिस अधिक्षक अमोघ गावकर यांच्या जागी जी. श्रीधर यांची नेमणूक झाली असून त्यांनी कामकाजाला सुरुवात केली आहे.

तामिळनाडू राज्यातील गोविंदराजन श्रीधर हे पुर्वी बिड जिल्हयाचे पोलिस अधिक्षक होते. त्याआधी ते औरंगाबाद ग्रामीणचे सहायक पोलिस अधिक्षक होते. त्यानंतर नागपूर येथे राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक 4 चे समादेशक असतांना त्यांची अकोला पोलिस अधिक्षक पदावर काल बदली झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment