जळगाव : भडगाव तालुक्यातील वडगाव सतीचे या गावी एका निरागस बालकाचा खून झाला असल्याची बातमी समोर येत आहे. या घटने प्रकरणी भडगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले असल्याचे देखील समजते.
भडगाव तालुक्यातील वडगाव सतीचे या गावी राहणा-या गरीब कुटूंबातील आयुष असे खुन झालेल्या तिन वर्षाच्या बालकाचे नाव पुढे आले आहे. या कथित खूनाच्या घटनेमुळे भडगाव तालुक्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी सविस्तर माहिती अद्याप हाती आली आलेली नाही.