भडगावच्या त्या बालकाचा मृतदेह आढळला विहिरीत

On: December 15, 2020 10:30 AM

जळगाव : भडगाव तालुक्यातील वडगाव सतीचे या गावी निरागस बालकाचा खून झाला असल्याची चर्चा सुरु असलेला तो बालक वडगाव सतीचे या गाव शिवारातील एका विहीरीत मयत अवस्थेत आढळून आला. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनचे पो.नि. अशोक उतेकर यांचेशी संपर्क साधण्यात आला.

“क्राईम दुनिया” शी बोलतांना पो.नि. उतेकर यांनी सांगीतले की सदर बालकाचा मृतदेह मध्यरात्री विहीरीत आढळून आला होता. पोलिस पथकाने तो मृतदेह बाहेर काढून पोस्ट मॉर्टम कामी रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. या प्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला भा.द.वि.363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक चौकशी सुरु असून वैद्यकीय अहवाल काय येतो त्यावर तपासाची दिशा ठरणार आहे. दरम्यान तालुक्यात या बालकाचा खून झाला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र वैद्यकीय अहवाला नंतरच खरा प्रकार समजणार आहे. दरम्यान या घटनेविषयी भडगाव तालुक्यात चर्चेला उधान आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment