जळगाव : जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील जिल्हा परिषद चौकाजवळ असलेल्या बॉम्बे हॉटेलमधे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा टाकण्यात आला. पोलिस उप अधिक्षकांच्या नियंत्रणखाली टाकण्यात आलेल्या या छाप्यामुळे खळबळ माजली आहे.
पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने टाकलेल्या या छाप्याच्या कारवाईत 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रोकडसह जुगाराचे साहित्य असा एकूण 2 लाख 10 हजार 946 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशनाला या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक नितीन गणपुरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय येरुळे, स.पो.नि. रविंद्र बागुल, पो.हे.कॉ. विकास महाजन, उमेश भांडारकर, सचिन वाघ, रविंद्र मोतीराया, सहाय्यक फौजदार विनयकुमार देसले, अशोक फुसे याच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
या कारवाईत विकास रमेश सोनवणे (45) शनीपेठ, फिरोज गुलाब पटेल (38) सदाशिव नगर, हेमंत रमेश शेटे (28) कांचननगर, अनिल रामभाऊ छडीकर (51) शिवाजीनगर, अशोक ओंकार चव्हाण (62) कानळदा रोड के.सीपार्क, घनशाम लक्ष्मणदास कुकरेजा (61) सिंधी कॉलनी, अनिल भिमराव ढेरे (52) लक्ष्मीनगर, पंढरी ओंकार चव्हाण (50) त्रिभुवन कॉलनी, रायचंद लालचंद जैन (61) गणपती नगर, रामदास दगडू मोरे (59) शाहूनगर, नितीन परशुराम सुर्यवंशी (40) हरिओम नगर, नजीर शफी पिंजारी (50) कोळीपेठ, पंकज वामन हळदे (19) चौघुले प्लॉट, आसीफ अहमद खाटीक (46) पिंप्राळा हुडको, ब्रिजलाल आनंदराम वालेचा (68) लक्ष्मीनगर, मोहम्मद सलिम मोहम्मद ईस्माईल (65) इस्लामपुरा, भवानीपेठ, सलिम खान मुसा खान (53) शिवाजीनगर, नूरा गुलाम पटेल (35) सुरेशदादा जैन नगर व पवन गुरुदासराम लुल्ला (42) सिंधी कॉलनी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टी.व्ही. सेटअप बॉक्स, मोबाईल, दुचाकी, रोकड व जुगाराचे साहित्य असा एकूण 2 लाख 10 हजार 946 रुपयांचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र बागुल करत आहेत.