यावल प.स.त रक्तगट तपासणी शिबीर उत्साहात

यावल : जागतिक एड्स दिनानिमित्त यावल पंचायत समिती येथे रक्त गट तपासणी शिबीर उत्साहात झाले. येथील पंचायत समिती सभागृहात जागतिक एड्स दिन पंधरवाड्याच्या निमित्ताने 14 डिसेंबर रोजी हे शिबीर झाले. ग्रामीण रुग्णालय यावल आयसीटीसी विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम व आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी डॉ . निलेश पाटील होते. शिबीराचे उद्‌घाटन डॉ. हेमंत बऱ्हाटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती सहाय्यक गटविकास अधिकारी लुकमांन तडवी याची होती. पंचायत समितीचे कार्यालयीन अधिक्षक अजय पाटील यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ निलेश पाटील यांनी एचआयव्ही एड्स या आजाराविषयी काळजी घेण्याबाबत सखोल माहिती दिली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत बऱ्हाटे यांनी एचआयव्ही व एसटीआय याबाबत सखोल माहिती सादर केली.

समुपदेशक वसंतकुमार संदानशिव यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. लिंक वर्कर अशोक तायडे यांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह बाधीत रुग्णांना कोणत्या सरकारी योजनांचा लाभ होतो याबाबत माहिती दिली. त्यात शासकीय अधिकारी तलाठी, ग्रामसेवक, यांच्याकडून विनामुल्य दाखले व शासकीय योजना उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती गोपनीय ठेवण्यात यावी असे देखील यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व तालुक्यातील ग्रामसेवक आवर्जून हजर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, डॉ. गजरे, डॉ. साजिद तडवी, यावलचे कल्पेश पाटील, सावखेडासिम लॅब टेक्नीशियन उपस्थित होते.

यावेळी जवळपास 35 जणांनी स्वेच्छेने कोरोना स्वॅब दिले. ते स्वॅब डॉ. गौरव भोईटे व कल्पेश पाटील यांनी घेतले. रक्त संकलन विभागाचे रवींद्र माळी तसेच छाया नन्नवरे यांनी सविस्तर माहिती दिली. वसंतकुमार संदानशिव सुत्रसंचालन यावेळी केले. तालुक्यातील ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समुपदेशक वसंतकुमार संदानशीव, लॅब टेक्निशियन रवींद्र माळी, लिंक वर्कर अशोक तायडे, छाया न्नानवरे, आसीफ पिंजारी, लतिश नेमाडे, प्रशांत शिंपी, संतोष भंगाळे राहुल बावस्कर, राजेश साळुंके आदी सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष परिश्रम लाभले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ .हेमंत बऱ्हाटे यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन देखील यावेळी लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here