तीन मुलींची हत्या करत पित्याची आत्महत्या

On: June 29, 2020 7:05 PM

वसई: आपल्या तीन मुलींची गळा चिरून हत्या करणा-या पित्याने स्वतःची देखील जिवनयात्रा संपवण्याची दुर्दवी घटना रात्री घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.

प्राप्त माहितीनुसार नालासोपारा पूर्व येथील डॉन लेन, बाबुलपाडा येथे कैलास विजू परमार (35 ) हा आपल्या कु. नयन परमार (12 ) , कु.नंदिनी परमार (7 ) आणि कु.नयना परमार (3 ) या तिघा मुलींसह रहात होता. गेल्या सहा महिन्यापूर्वी कैलासची पत्नी त्याच्यापासून विभक्त रहात होती. घरात तो आपल्या तिन्ही मुलींसह रहात होता. काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास कैलास परमार याने आपल्या तिघा मुलींचा चाकूने गळा चिरून खून केला. त्यानंतर स्वत:वर देखील चाकूने वार करत आपली जिवनयात्रा संपवली. या हत्येमागचे नेमके कारण समजू शकले नसून पोलिस तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment