जळगाव : मुक्ताईनगर येथे बेकायदा देशी विदेशी मद्य विक्री करतांना आढळून आलेल्य दोघांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेल्या दोघा जणांना मुक्ताईनगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वासुदेव लक्ष्मण कोळी व रघुनाथ बाजीराव (दोन्ही रा. मुक्ताईनगर) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का. जितेंद्र पाटील, पोलिस नाईक किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, पो.कॉ. सचिन महाजन, ईशान तडवी यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. त्यांच्या कब्जातून 24 हजार 655 रुपये किमतीची देशी विदेशी दारु आणि बियरचा साठा जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला मुंबई दारुबंदी कायदा कलम 65 (ई) (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.