जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त परिसंस्था आणि प्रशाळेच्या चालू वर्षाच्या परिक्षा फक्त ऑनलाईन स्वरुपात घेतल्या जाणार आहेत. या परिक्षा 5 जानेवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मुल्यमापन केंद्र संचालक बी.पी.पाटील यांनी कळवले आहे.
या परिक्षा ऑफलाईन होणार असल्याचे महाविद्यालयांना कळवण्यात आले होते. 28 डिसेंबर पासून काही अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन देखील झाले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाईन एवजी ऑनलाईन पध्दतीने 5 जानेवारीपासून घेतल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना सॉफटवेअरच्या हाताळणी व सरावासाठी सराव चाचणीचे आयोजन आवश्यक आहे. यासाठी 28 डिसेंबरपासून होणाऱ्या परीक्षा 5 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिर केले जाणार आहे.








