यावल – रोजगार हमी योजनेच्या कामाच्या चौकशीचे आदेश

यावल : यावल पंचायत समितीमार्फत करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांची तात्काळ चौकशी करुन त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश रोजगार हमी योजनेचे उप जिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी दिले आहे.

यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये पंचायत समितीच्या माध्यमातुन रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत विविध विकास कामे झाली आहेत. या कामांमधे झालेल्या मोठया स्वरुपात गैर व्यवहार झाला असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची तातडीने चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आदेश मते यांनी गट विकास अधिका-यांना दिले आहेत.

या संदर्भात प्रसाद मते यांनी दिलेल्या आदेशात नमुद केले आहे की यावल तालुक्यातील उंटावद, पिळोदा, मनवेल, निमगाव, राजोरा, अंजाळे, वाघळुद, माररुळ, सांगवी बु॥, चिखली खु॥ अट्रावल या सर्व ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत वॉल कंपाऊंडचे बांधकाम झाले आहे. या कामात मोठया प्रमाणावर बोगस मजुरांची नोंदणी करुन निकृष्ठ दर्जाची कामे झाल्याची ओरड होत आहे. तशा तक्रारी विविध सामाजीक संघटनांच्या माध्यमातून करण्यात आल्या.

या तक्रारींची दखल घेत प्रसाद मते यांनी दखल घेत यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांना कार्यवाही केल्याचा अहवाल जळगाव कार्यालयास पाठवण्यास सांगितले आहे. यामुळे बांधकाम अभियंते तथा ठेकेदारांच्या गोटात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here