जळगाव : बेलगंगा साखर कारखान्यातील 2018-19 या गळीत हंगामातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची प्रमाणित करण्यात आलेली उसाची रक्कम 386.06 लक्ष रुपये व त्यावरील 15% व्याजासह शेतकऱ्यांना देण्यास कसूर केल्याच्या कारणामुळे बेलगंगा सहकारी साखर कारखाना (अंबाजी शुगर्स लि.) ची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कारखान्याच्या मालमत्तेच्या 7/12 उताऱ्यावरून अंबाजी शुगर्सचे नाव काढून त्याठिकाणी मालक म्हणून महाराष्ट्र शासनाचे नाव लावण्यात आले आहे.
साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी ऊस (नियंत्रण )आदेश 1966 चे कलम 3(8) नुसार आदेश पारीत करण्यात आले आहेत. बेलगंगा साखर कारखान्याची अर्थात अंबाजी शुगर्स लिमिटेडची भोरस बुद्रुक व डोणदिगर या गावाच्या शिवारातील सर्व मालमत्ता जप्तीचा आदेश तहसीलदार अमोल मोरे यांनी काढले आहे. पुढील आदेश होईपर्यंत या प्रॉपर्टीची विक्री अथवा हस्तांतरण करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.