शंभर फुट उंचावरुन कोसळला ट्रक – चालक जागीच ठार

On: December 18, 2020 2:13 PM

अकोला : अकोला शहरातून जाणारा मालवाहू ट्रक आज भल्या पहाटे 100 फूट उंच पूलावरून कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत चालक जागीच ठार झाला असून ला ट्रक, चालक जागेवर ठार झाला असून क्लिनर जखमी झाला आहे. अकोला येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना सदर घटना काटेपुर्णा पुलावरील खड्डे चुकवतांना घडल्याचे म्हटले जात आहे.

संपुर्ण राज्याभरात असलेले महामार्गावरील खड्डे जणू काही मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. दररोज कुठे ना कुठे खड्डे चुकवतांना अपघात होत असतात. या अपघातात कुणाचा मुलगा, कुणाचा पती, कुणाचे वडील या रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात. या अपघाताच्या घटना सरकार दरबारी पोहोचतात मात्र या अपघातात मृत्यू झालेल्या कुटूंबाच्या वेदना मात्र सरकारदरबारी पोहोचत नसल्याचे खुलेआम म्हटले जाते.

साहेब खा युसुफ खा असे मृत पावलेल्या ट्रक चालकाचे तर औरंगजेब खा हलील खा असे जखमी क्लिनरचे नाव आहे. लोडेड ट्रकचा या अपघातात चुराडा झाला आहे. पहाटेच्या वेळी धुके आणी खराब रस्ते यातून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असल्याचे पोलिस सुत्रांचा अंदाज आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment