अर्जुन रामपालची एनसीबीला प्रतीक्षा

On: December 20, 2020 12:06 PM

मुंबई : बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण कक्षाला (एनसीबी) अभिनेता अर्जुन रामपालची लंडनहून परतण्याची प्रतीक्षा आहे. तो मुंबईत आल्यानंतर 22 डिसेंबरला त्याची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्जुन रामपाल यास चौकशीकामी 16 डिसेंबर रोजी एनसीबी कार्यालयात हजर होण्यासाठी समन्स बजावले होते. तो परदेशात असल्याचे त्याने वकिलांमार्फत एनसीबीला कळवले होते.

दीड महिन्यांपूर्वी पथकाने त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानावर छापा टाकून मोबाइल, लॅपटॉप, टॅब जप्त केले होते. त्याची दक्षिण आफ्रिकन गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सची दोन दिवस तर रामपालची एकदा चौकशी झाली आहे. त्याच्या चालकाची देखील चौकशी केली होती. ग्रॅबिएलाचा भाऊ अंजिलीयसला ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक झाली होती. अजून काही पुढे आल्यामुळे अर्जुन रामपाल यास चौकशीसाठी समन्स जारी केले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment