रागाच्या भरात गेली आणि मुंबईत गवसली

जळगाव : रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला एमआयडीसी पोलिस पथकाच्या मदतीने मुंबई येथून ताब्यात घेण्यात यश आले.
जिनत फातेमा अफजल मिया शेख या तेरा वर्षाच्या मुलीच्या वडीलांचे आठ वर्षापुर्वी निधन झाले आहे. वडीलांच्या निधनानंतर जिनतच्या आईने दुसरे लग्न केले असून ती पतीच्या घरी यावल तालुक्यात राहते. त्यामुळे जिनतचे पालकत्व तिचे काका अफजल मिया कुदबुद्दीन शेख यांनी स्विकारले आहे. ते जिनतचे पालणपोषण करतात. अफजल मिया कुदबुद्दीन शेख हे मोलमजुरी करणारे असून मास्टर कॉलनी भागात राहतात.

गेल्या 16 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जिनतला त्यांनी दुकानात दुध आणण्यासाठी पाठवले होते. मात्र जिनतला घरगुती कारणावरुन राग आला होता. त्यामुळे रागाच्या भरात ती मुंबई येथे निघून गेली होती. बराच वेळ झाला तरी जिनत घरी परत आली नाही म्हणून तिचे काका अफजल मिया बेचैन झाले होते. त्याच्यासह घरातील सर्व सदस्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती कुठेही मिळून आली नाही. अखेर दुस-या दिवशी त्यांनी तिच्या अपहरणाची तक्रार एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल केली.

या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, म.पो.हे.कॉ. मालती वाडीले, पो.ना. मिलींद सोनवणे, पो.ना. इम्रान सैय्यद, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. सुधीर साळवे यांनी सुरु केला होता. तपासादरम्यान त्यांना सामजीक कार्यकर्ते इकबाल पिरजादे व जिया बागवान यांचे महत्वाचे सहकार्य लाभले. तपासादरम्यान पोलिस पथकाला जिनत ही मुंबई येथे असल्याची गोपनीय माहिती समजली. त्या माहितीच्या आधारे पथक मुंबईला गेले. त्यांनी जिनतला ताब्यात घेत जळगावला परत आणले.

अल्पवयीन जिनत ही रागाच्या भरात घरातून निघून गेली होती. आपली पुतणी परत मिळाल्यामुळे अफजल मिया शेख यांनी एमआयडीसी पोलिस पथकाचे आभार मानले. या तपासकामी सामाजिक कार्यकर्ते इकबाल पिरजादे व जिया बागवान यांनी चांगले सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here