जळगाव जिल्ह्यात 6 जानेवारीपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

On: December 23, 2020 8:03 PM

जळगाव : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात येत्या 6 जानेवारी 2021 पावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले आहे.

या कालावधीत पाच अथवा पाचपेक्षा जास्त लोकांचा समुदाय करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास तसेच मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश विवाह मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, अंत्ययात्रा यांना लागू राहणार नसल्याचे राहुल पाटील – अप्पर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी कळवले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment