जळगाव : दिवसाढवळ्या शहरात घरफोड्या करणा-या दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा अल्पवयीन मुलांनी रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीत घरफोडीचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.
18 डिसेंबर रोजी वैभव स्टेट बॅंक कॉलनी परिसरातील रहिवासी तथा जेष्ठ नागरीक कांतीलाल पृथ्वीराज वर्मा हे त्यांचा जेवणाचा डबा घेण्यासाठी गेले होते. परत आल्यावर दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा त्यांना तुटलेला आढळून आला होता. त्यांच्या घरातील पन्नास हजार रुपये किमतीचे दागीने व रोख रक्कम चोरी झालेली होती. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्य पथकातील सहायक फौजदार अशोक महाजन, प्रमोद लाडवंजारी किरण धनगर यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीदरम्यान दोघा मुलांनी कांतीलाल जैन यांच्या घरातील चोरीची कबुली दिली. दोघा मुलांना पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलिसांच्य ताब्यात देण्यात आले आहे.