तुर्कीत सापडली सोन्याची खाण

जळगाव : सन 2020 हे वर्ष सोन्याच्या दराबाबत चर्चेत राहील. सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाल्यास यावर्षी सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली. कोरोनाचा ज्वर उच्चांकावर असतांना नुकसान भरपाईसाठी सोन्याची मागणी वेगाने वाढली.

दरम्यान तुर्कीमधे सोन्याचे प्रचंड साठे सापडले असल्याची बातमी देखील पुढे आली आहे. आपणास आश्चर्य वाटेल परंतु हे खरे आहे की तुर्कीत सोन्याचे साठे मोठ्य प्रमाणात सापडले आहेत. या सोन्याच्या खजिन्याचे मुल्य जवळपास 44 हजार कोटीच्या घरात आहे.

स्टेट न्युज एजन्सीने दिलेल्या अहवालानुसार सोगुट शहरात जवळपास 6 अब्ज डॉलर अर्थात 4,432 कोटी रुपयांचे 99 टन सोने सापडले आहे. सोगुट शहरातील अ‍ॅग्रीकल्चरल क्रेडिट को ऑपरेटिव्ह आणि गुब्रेटस उर्वरक उत्पादन कंपनी चालवणारे फाहरेतीन पोयराज यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दोन वर्षात सोन्याची खाण सुरु करणार असल्याचे पोयराज यांनी म्हटले आहे. त्यासाठी सुमारे 6 अब्ज डॉलर्स खर्च अपेक्षीत असल्याचे देखील पोयराज यांनी म्हटले आहे. सोन्याची खाण सुरु केल्यामुळे तुर्कीची अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. या वृत्तानंतर गुब्राटसचे शेअर्स 10% वाढले आहे. सन 2019 च्या न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याच्या गुब्रेटस उर्वरक कंपनीने दुसर्‍या कंपनीकडून या जागेवर नियंत्रण घेतले असल्याचे पोयराज म्हणाले.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने दिलेल्या अहवालानुसार अमेरिकेजवळ भारतापेक्षा 13 पट अधिक सोने आहे. अमेरिकेजवळ एकुण 8,133.5 टन सोन्याचा साठा उपलब्ध आहे. दुसर्‍या क्रमांकावर जर्मनी आहे. जर्मनीकडे 3,366.8 टन सोने आहे. अमेरिका आणि जर्मनीनंतर आंतरराष्ट्रीय मुद्रा फंड अर्थात आएमएफ जवळ एकुण 2,451.8 टन एवढे सोने उपलब्ध आहे. त्यानंतर इटली या देशाचा क्रमांक लागतो. इटलीजवळ 2,451.8 टन एवढे सोने आहे. फ्रान्सजवळ 2,436.1 टन एवढे सोने आहे. रशियाकडे 2,219.2 टन सोन्याचा साठा आहे. चीनकडे 1,936.5 एवढे टन सोने आहे. स्विझरलँडकडे 1,040 टन सोने उपलब्ध आहे. जापानकडे 765.2 एवढे टन सोने आहे. भारताकडे 657.7 टन सोन्याचा साठा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here