देशी दारुच्या दुकानावरुन चोरलेला मोबाईल हस्तगत

On: December 26, 2020 6:23 PM

जळगाव : दारु पिण्यास गेलेल्या ग्राहकाचा मोबाईल काउंटरवरुन चोरी झाल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीस मोबाईलसह एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

विशाल अशोक सरोदे हे 23 डिसेंबर रोजी एमआयडीसी हद्दीतील हॉटेल अंबरनाथ शेजारी असलेल्या देशी दारुच्या दुकानात दारु पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी काऊंटरवर ठेवलेला त्यांचा मोबाईल कुणीतरी चोरट्याने चोरुन नेला होता. याप्रकरणी त्यांनी 25 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशनला मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला.

पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरिक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, मुदस्सर काझी, सचिन पाटील आदी करत होते. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिस तपास पथकाने अमोल सोपान टोंगळे (28) रा. रामनगर शास्त्री गल्ली मेहरुण यास ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment