पुणे: दुस-याचे भविष्य सांगणा-या महिलेला आपले भविष्य समजू शकले नाही. केबीसीच्या माध्यमातून पंचवील लाख रुपयांची लॉटरी लागल्याचा तिला फोन आला. या रकमेच्या मोहात व फसव्या कॉलला बळी पडल्याने या महिलेला 4 लाख 15 हजार रुपये गमवावे लागले आहेत.
31 वर्षाच्या या महिलेने अलंकार पोलिसात रितसर फिर्याद दाखल केली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार 5 मोबाईल धारक व एसबीआय खातेधारकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 18 एप्रील ते 12 मे या कालावधीत घडला आहे. या घटनेतील फिर्यादी महिला डहाणूकर कॉलनीतील रहिवासी आहे. या महिलेला आलेल्या कॉलद्वारे पलीकडून सांगण्यात आले की आपण एसबीआय मधून बोलत असून आपणास केबीसीच्या माध्यमातून 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे.
सदर रक्कम खात्यात जमा करण्यासाठी आपणास अगोदर टॅक्स भरावा लागेल. त्यासोबत इतर घटकांची पुर्तता करावी लागेल. आपणास लॉटरी लागल्याचे समजताच या महिलेने पलीकडून मिळालेल्या सुचनेनुसार वेळोवेळी 4 लाख 15 हजार रुपये भरले. एवढी रक्कम भरल्यावर देखील आपणास लॉटरीचे पैसे मिळत नसल्याचे व आपली फसवणूक झाल्याची या महिलेची खात्री झाली. अखेर तिने अलंकार पोलिस स्टेशनला या फसवणूकीच्या प्रकाराची तक्रार दाखल केली. पुढील तपास सुरु आहे.