लोणावळा (विशेष प्रतिनिधी) : क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन व क्राईम बॉर्डर गेल्या कित्येक वर्षापासून समाजहिताचे कार्य करत आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उक्तीनुसार या संस्थेचे काम चालू असते. चला पेटवू दिवे जिथे अजूनही अंधार आहे हे स्लोगन घेऊन सदर एनजीओ कार्यरत आहे. एनजीओ मार्फत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या संस्था, आश्रम, वाड्या-वस्त्या, आदिवासी पाडे, वस्ती वरील मुले – मुली, शाळेतील विद्यार्थी अशा विविध गटात येणाऱ्या सर्वांसाठी क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे कार्य सुरु असते.
सदर एनजीओच्या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चित्रा उर्फ श्रावणी कामत यांनी पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. सीमा वखरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील जय जनार्धन अनाथालय वृद्धाश्रमास मागच्या महिन्यात भेट दिली. या वृद्धाश्रमाच्या कामकाजाचा आढावा घेतला असता जय जनार्दन अनाथ वृद्धाश्रमाची स्थापना सन 2003 मधे झाल्याचे समोर आले.
सदर संस्था ही अतिशय उत्कृष्ट कार्य करत असून संस्थाचालक व तेथील स्वयंसेवक निस्वार्थपणे कार्य करत आहेत. त्यांनी आतापावेतो अनाथ मुलींचे संगोपन करुन 76 मुलींचे योग्य स्थळ बघून त्यंचे लग्न लावून दिले आहेत. तसेच 52 अनाथ मुलांचे देखील त्यांनी लग्न लावून दिले आहेत. सदर संस्था ही अनाथ वृद्धांचे संगोपन करत आहे. सध्या या आश्रमात 75 मुले व मुली शिक्षण घेत असून सदर संस्थेचे संस्थापक परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी महाराज आहेत. तसेच सचिव दिलीप बाबुराव गुंजाळ व व्यवस्थापक सौ संगीता दिलीप गुंजाळ, श्रीमती संगीता शंकर सोनवणे हे अथक परिश्रम घेत आहेत.
या सर्वांची भेट घेऊन या संस्थेला सीआरडब्ल्यूए व क्राइम बॉर्डर यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ चित्रा उर्फ श्रावणे कामत यांनी अत्यावश्यक वस्तू येथील मुलांना भेट म्हणूण दिल्या. येथील मुला मुलींनी चांगले शिकून चांगले जीवन जगावे या उद्देशाने कार्यरत आहेत. संस्थेकडे स्वतःची जागा असली तरी मुलांना राहण्यासाठी बांधकाम करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्राइम बॉर्डरच्या पत्रकार व पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. चित्रा श्रावणी कामत उपस्थित होत्या. रवींद्र कदम, सुरेखा कदम, स्वप्ना सावंत, जितेश खाडे पेडिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दिलीप गुंजाळ यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.