जळगाव : वाकोद ता. जामनेर येथील रवींद्र नामदेव महाले याच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे या खूनाचा उलगडा झाला आहे.
अभिजित चरणदास पाटील (21), रा. पिंपळगाव कमानी खुर्द ता. जामनेर व योगेश भगवान आस्कर (24), रा. वाकोद ता. जामनेर अशी अटकेतील दोघा तरुणांची नावे आहेत. यापैकी योगेश हा अभिजीत याचा मामा आहे. दोघे नात्याने मामा व भाचे आहेत.
वाकोद येथील रहिवासी असलेल्या रवींद्र नामदेव महाले याचा मृतदेह पहूर रुग्णालयानजीक एकुलती रस्त्याच्या बाजूला आढळून आला होता. सदर घटना शनीवारी घडली होती. सुरुवातीला या प्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. शोक संतप्त नातेवाईकांनी मृतदेह पहुर पोलिस स्टेशनला आणला होता. डीवायएसपी कातकाडे यांनी नातेवाईकांची समजूत काढून अंत्यसंस्कार करण्यास सांगीतले होते. अशोक रामदेव महाले यांच्या फिर्यादीनुसार योगेश आस्कर यांच्याविरुद्ध खुनाचा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर दुसरा संशयीत अभिजित पाटील यास रात्रीच अटक करण्यात आली.
घटना उघडकीस आल्यानंतर शशिकांत पाटील, भरत लिंगायत, प्रदीप चौधरी, विनय सानप, अनिल राठोड, अनिल देवरे, ईश्वर देशमुख, ज्ञानेश्वर ढाकरे, ज्ञानेश्वर बाविस्कर यांनी दोघा संशयीतांना एका दिवसात गजाआड केले.