जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलीस पथकाने चोरीच्या मोटार सायकलसह चोरट्यास अटक केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या मोटार सायकलच्या चोरीचा गुन्हा भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला दाखल असल्याचे तपासाअंती उघड झाले.
राम मुकेश करोसिया (21) भवानी नगर नशिराबाद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पेट्रोलिंग दरम्यान त्याला भुसावळ बस स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.गणेश धुमाळ, अनिल मोरे, मंगेश गोटला, पोलीस नाईक रवींद्र बि-हाडे, रमन सुरळकर, उमाकांत पाटील, पो.कॉ.विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, दिनेश कापडणे, कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.