मुंबई : नव्या वर्षात नवा पोलीस महासंचालक मिळेल असे म्हटले जात आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे नवे पोलिस महासंचालक कोण असतील याची राज्य पोलिस दलात तर्कवितर्क सुरु आहेत.
या चर्चेदरम्यान बिपिन बिहारी, हेमंत नगराळे, संजय पांडे आणि रश्मी शुक्ला ही चार नावे आघाडीवर आहेत. पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेले आहेत. त्यांच्या जागी कोण येणार याची प्रतिक्षा लागून आहे.
हेमंत नगराळे हे 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आता त्यांच्याकडे कायदा विभागाची जबाबदारी आहे. संजय पांडे हे 1986 बॅचचे आयपीएस अधिकारी असून आता ते होमगार्ड विभाग प्रमुख आहेत. रश्मी शुक्ला या 1988 बॅचच्या आयपीएस अधिकारी असून आता त्या नागरी हक्क विभागाच्या प्रमुख आहेत. पोलीस महासंचालकपदाच्या शर्यतीमधील बिपिन बिहारी हे ठाकरे परिवाराच्या जवळचे म्हटले जातात. सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी हाताळली होती.