नाशिक : निफाडचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलीचा विवाहसोहळा सुरु होता. या विवाहसोहळ्यात बडे बडे मंत्री आणि अधिका-यांची उपस्थिती होती. या विवाह सोहळ्याला जिल्हाधिकारी सुरज मांढरे हे देखील उपस्थित होते. यावेळी साहजीकच सुरक्षा व्यवस्था देखील तेवढीच प्रबळ लावण्यात आली होती.
मात्र या सुरक्षा व्यवस्थेला भेदून एका भामट्याने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे पाकीट मारण्याची करामत दाखवून दिली. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सचा नियम पायदळी तुडवण्यात आला होता. त्यामुळे हा देखील एक चर्चेचा विषय झाला होता. नाशिक शहरातील बालाजी लॉन्समध्ये हा विवाह सोहळा झाला.