नाशिक येथे गॅस गळतीमुळे स्फोट – 5 जखमी

नाशिक : सिडको परिसरातील खुटवडनगर येथील धनदाई कॉलनीतील एका बंगल्यात आज सोमवारी (दि.4) सकाळी सातच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात घरातील पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करत लागलेली आग विझवण्यात आली. जखमींना तात्काळ रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

खुटवडनगर येथील पगार कुटुंबातील  पुष्पा पगार या सोमवारी सकाळी सातच्या सुमारास स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी गॅस पेटवण्यापूर्वी घरात अगोदरच गॅसची गळती झालेली होती. त्यामुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे घरातील दरवाजे खिडक्या आणि भिंती  तुटल्या.खिडक्यांची तावदाने तर अंगणात येऊन पडली होती. घराबाहेर असलेल्या वाहनांच्या काचा देखील फुटल्या. या स्फोटात  पुष्पा बळीराम पगार, त्यांचे पती बळीराम पगार, मुलगा अतुल पगार, मुलगी अश्विनी पगार तसेच नातू रोहन व रुची असे सर्व जण जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here