मुंबई : आयकर कर चुकवल्याच्या आरोपाखाली झी समूहाच्या विविध 15 ठिकाणी आयकर विभागाकडून सर्च ऑपरेशन केले जात असल्याचे समजते. मुंबई येथील झी समूहाच्या कार्यालयांवर आज सकाळी अकरा वाजेपासून आयकर विभागाकडून छापेमारी सुरु करण्यात आली आहे.
आयकर विभागाच्या ६ अधिकाऱ्यांचीचा समुह झी गृपच्या लोअर परळ परिसरातील कार्यालयावर छापेमारी करत आहे. दुस-या पथकाने वरळी परिसरातील मुख्य कार्यालयावर छापा टाकला. याप्रकरणी सखोल माहिती अद्याप मिळू शकली नाही. आयकर चुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली झी समूहाच्या विविध ठिकाणी आयकर विभागाकडून सर्च ऑपरेशन केले जात असल्याचे समजते.