वाकोद येथील खून प्रकरणी युवक अटकेत

On: January 4, 2021 5:38 PM

जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथील खूनप्रकरणी आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. रोटवद ता. जामनेर येथील युवकास पहूर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री अटक केली आहे.

वाकोद येथील खूनप्रकरणी योगेश आस्कर, अभिजित पाटील यांना अटक झाल्यानंतर पवन देशमुख (रोटवद) याला अटक झाली. चौकशीदरम्यान मनसिराम धारासिंग बारेला याचे नाव पुढे आल्यामुळे त्याला देखील अटक झाली. याशिवाय अल्पवयीन मजुराला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
तपासाअंती रोटवद येथील सहावा संशयीत पवन मंगू राठोड (32) या युवकास पोलिस उपनिरीक्षक किरण बर्गे यांच्यासह भरत लिंगायत, ज्ञानेश्वर ढाकरे, ईश्वर देशमुख व गायकवाड आदींनी आज सोमवारी पहाटे ताब्यात घेत अटक केली.

योगेश, अभिजित व पवन या तिघांसह मनसिराम धारासिंग बारेला हा पोलीस कस्टडीत असून मुदत संपल्यामुळे त्यांना जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने चौघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. योगेश,अभिजित व पवन या तिघांना तिसऱ्या वेळेस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment