चेन्नई : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेनिमीत्त चेन्नई येथे दाखल झालेल्या खेळाडूंच्या राहण्याची सोय लिला पॅलेस या हॉटेलमधे केली आहे. या हॉटेलचे तब्बल विस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान तामिळनाडू क्रिकेट संघाने मात्र खेळाडू सुरक्षित असल्याचे कळवले आहे. चेन्नईच्या लिला पॅलेस हॉटेल येथे प्लेट गटातील मेघालय, मणिपूर आणि मिझोराम या तीन संघांचे खेळाडू मुक्कामी आहेत. येत्या 10 जानेवारीपासून या स्पर्धांना सुरुवात होणार आहे.
दरम्यान बंगळुरु येथे पोहोचलेल्या जम्मू-काश्मिर संघातील दोन खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या अहवालानंतर दोन खेळाडूंसह सर्व संघालाच विविध खोल्यांमधे ठेवण्यात आले आहे. या खेळाडूंची नव्याने कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. चेन्नई येथील हॉटेल लिला पॅलेस पुर्णपणे सॅनिटाईझ करण्यात आले आहे.