अट्टल मोटारसायकल चोरटा जेरबंद

On: January 6, 2021 6:08 PM


जळगाव : चोरी केलेली दुचाकी वापरणा-या चोरट्याला त्याच्या ताब्यातील दुचाकीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याला दुचाकीसह पुढील तपासकामी एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. गोपाळ भगवान कोळी (35) जोशी वाडा मेहरुण – जळगाव असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.

पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, राहुल पाटील व प्रितम पाटील यांच्या पथकाने जळगाव तालुक्यातील किनोद येथून ताब्यात घेत अटक केली. त्याच्या ताब्यातील हिरो मॅस्ट्रो कंपनीची दुचाकी चोरी झाल्याबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता. पुढील तपासकामी त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment