आयजी पथकाच्या तिस-या धाडीने अमळनेर पुन्हा चर्चेत

जळगाव : यापुर्वी दोन वेळा विशेष आयजी पथकाने अमळनेर पोलिस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यावर छापे टाकलेले आहेत. आता पुन्हा तिस-या वेळेस आयजी पथकाने अमळनेर शहरात चार ठिकाणी छापे टाकल्यामुळे अमळनेर पुन्हा चर्चेत आले आहे. या छाप्यात सट्टा जुगार खेळताना 28 जणांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

अटकेतील जुगा-यांकडून साडे तीन लाख रुपयांची रोकड व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. बुधवारी 6 जानेवारी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांच्या गोटात खळबळ माजली आहे.

काही दिवसांपूर्वी आयजी पथकाकडून अमळनेर शहरातील अवैध धंद्यावर दोन वेळा छापे टाकण्यात आले होते. आता हा तिस-या वेळेचा छापा होता. सहायक पोलिस निरिक्षक संदीप पाटील, स.पो.नि. सचिन जाधव, उमाकांत खापरे, नितीन सपकाळे, राजेंद्र सोनवणे, सुरेश टांगोरे, विश्वेश हजारे, नारायण लोहरे, केतन पाटील यांच्या पथकाने वेशभुषा बदलून सट्टा जुगारावर छापे टाकले. महात्मा गांधी शॉपिंग कॉम्प्लेक्स, सानेगुरुजी शॉपिंग कॉम्प्लेक्स, लुल्ला मार्केट तसेच गांधीनगर परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here