मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार आता हेमंत नगराळे यांच्याकडे आला आहे. सध्या ते लिगल व टेक्निकल विभागाचे डीजी देखील आहेत. सुबोधकुमार जयस्वाल यांना केंद्रात प्रतिनियुक्ती मिळाली आहे. त्यामुळे नुतन वर्षात राज्याला नुतन पोलीस महासंचालक कोण मिळणार याकडे पोलिस विभागाचे लक्ष लागून होते.
महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हेमंत नगराळे यांना देण्यात आला आहे. पोलिस महासंचालक पदाच्या शर्यतीत हेमंत नगराळे यांच्यासह बिपीन बिहारी, संजय पांडे व रश्मी शुक्ला असे चोघे अधिकारी होते. मात्र हेमंत नगराळे यांनी त्यात बाजी मारली आहे.
बिपिन बिहारी हे सन 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते गृहनिर्माण विभागाचे प्रमुख आहेत. हेमंत नगराळे हे सन 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून सध्या त्यांच्याकडे लीगल आणि टेक्निकल विभागाची देखील जबाबदारी आहे. संजय पांडे हे सन 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून सध्या ते होमगार्ड विभागाचे सुप्रिमो आहेत. रश्मी शुक्ला या सन 1988 बॅचच्या आयपीएस अधिकारीअसून त्या नागरी हक्क विभागाच्या प्रमुख आहेत. हेमंत नगराळे यांच्या नावाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सुप्रिमो शरद पवारांची पसंती मिळली आहे.