26/11 च्या मुंबई हल्ल्यातील मास्टर माईंड असलेला आरोपी जकी उर रहमान लख्वी यास आज शुक्रवार 8 जानेवारी रोजी पाकिस्तानातील लाहोरच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने पंधरा वर्षाची शिक्षा सुनावली आहे. डिस्पेंसरीच्या नावाखाली पैसे जमा केल्यानंतर तो त्या रकमेचा दहशतवादी कृत्यांसाठी वापर करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. काळ्या यादीत जाण्याच्या भितीपोटी पाकिस्तानने एफएटीएफच्या (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) बैठकीपूर्वी आरोपी जकी उर रहमान लख्वी यास अटक केली आहे.
लश्कर ए तोयबाचा कमांडर आणि 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लख्वीला (61) हा होता. टेरर फंडिंगप्रकरणी पाकिस्तानातील न्यायालयाने त्याला पंधरा वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. टेरर फंडिंगसंबंधीत प्रकरणी लख्वीला काही दिवसांपूर्वी अटक झाली होती.
करण्यात आली होती. लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने शुक्रवारी म्हणजेच आज लख्वीला ही शिक्षा ठोठावली आहे. डिस्पेंसरीच्या नावाखाली पैसे जमा केल्यानंतर तो ते पैसे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याकामी वापरत होता.