आमच्याकडे म्हशी आहे…..माझे घर तिथे आहे हरवलेली बालिका पालकांच्या सुखरुप स्वाधीन

जळगाव – काही दिवसांपुर्वी जिल्हा पेठ पोलिसांनी हरवलेल्या बालिकेच्या आईवडीलांचा शोध लावत तिला तिच्या आईवडीलांच्या स्वाधीन केले होते. या घटनेनंतर आता एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने देखील अशाच एका हरवलेल्या बालिकेला तिच्या आई वडीलांच्या ताब्यात दिले आहे. हरवलेल्या बालिकेस तिचे आईवडील मिळाल्यामुळे तिच्या रडण्याचे हसण्यात परिवर्तन झाल्याचे दिसून आले. तिच्या पालकांना देखील आपली मुलगी मिळाल्याचा अत्यानंद झाला.

जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक एक तिन वर्षाची बालिका रडत होती. रस्त्याने जाणा-या काही लोकांनी तिला एमआयडीसी पोलिस स्टेशनला आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान बालिकेचे रडणे काही केल्या थांबत नव्हते. त्यामुळे महिला पोलिस नाईक निलोफर सय्यद यांनी तिची समजूत काढण्यास सुरुवात केली. पोलिस नाईक सैय्यद यांनी तिला खाण्यास बिस्किटे दिली तरी देखील तिचे रडणे काही केल्या थांबत नव्हते. आमच्या घरी म्हशी आहे….. माझे घर तिकडे आहे. एवढेच ती बालिका रडून सांगत होती.

तिच्या त्रोटक माहितीच्या आधारे पोलिस नाईक अतुल पाटील, पो.कॉ. गोविंदा पाटील, राकेश बच्छाव आदींचे पथक बालिकेच्या आईवडीलंचा शोध घेण्यास रवाना झाले. दरम्यान बालिकेची समजूत काढण्याचे काम पोलिस नाईक निलोफर सैय्यद यांनी बखुबी निभावले.

आमच्याकडे म्हशी आहे या वाक्यावरुन हद्दीतील सर्व गायी म्हशी पाळणा-यांचा शोध घेण्यात आला. तिन तासांच्या अथक परिश्रमानंतर पोलिस पथकाला यश आले. योगेश मारुती गवळी असे त्या बालिकेच्या पित्याचे नाव निष्पन्न झाले. त्यांना पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले. दरम्यान बालिकेचे मामा पोलिस स्टेशनला दाखल झाले. होते. मात्र तिच्या पालकांची ओळख पटवणे महत्वाचे होते. त्यामुळे तिचे आई वडील पोलिस स्टेशनला आल्यानंतर बालिकेने त्यांना बघून जोरदार मिठी मारली. त्या बालिकेच्या आईवडीलांसह मामाची देखील ओळख पटल्यानंतर तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. सदर बालिका सम्राट कॉलनी गवळीवाडा येथुन खेळत असतांना हरवली होती.

1 COMMENT

  1. पोलीस बांधवांचे आभार मानले तेवढे कमीच पडतील
    खूपखूप अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here