जळगाव : शिवाजी नगर घरकुल भागात काही वेळापुर्वी एकाने राहत्या घरात छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. पती पत्नीचा वाद या आत्महत्येस जबाबदार असल्याचे देखील म्हटले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार आज दुपारी पती पत्नीत जोरदार वाद झाल्याचे समजते. हा वाद जळगाव शहर पोलिस स्टेशनला गेला होता. त्यानंतर पतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीस नातेवाईकांनी सामान्य रुग्णालयात नेले असल्याचे देखील समजते. या आत्महत्येप्रकरणी जळगाव शहर पोलिसात अद्याप कुठलीही नोंद नसल्याचे समजते.