रावेर : ग्रा.प. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गौरखेडा ता. रावेर येथे शांतता समितीची बैठक नुकतीच उत्साहात झाली. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या बैठकीत सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांचे उपस्थितांना मार्गदर्शन लाभले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांनी निवडणूकीबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली. गौरखेडा गावातील तीन वार्डात होत असलेली निवडणूक कायदेशीर बाबींच्या अधीन राहून पार पाडण्याचे आवाहन यावेळी महेंद्र पाटील यांनी गावक-यांना केले. यावेळी अहमद तडवी, गफुर तडवी, महेंद्र पाटील, साहेब राव पाटील, कैलास पाटील पोलीस पाटील ,बाळू महाजन, सुधाकर महाजन, सचिन पाटील, दिनकर पाटील, सलिम तडवी, गुलशेर तडवी, वसिम तडवी, जानकी राम पाटील, हरचंद भालेराव, पंडित भालेराव, नरेंद्र भालेराव आदी मंडळी हजर होते.