मोटार सायकलसह चोरटा एलसीबीच्या ताब्यात

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : अमळनेर येथुन मोटार सायकल चोरट्यास त्याच्या ताब्यातील चोरीच्या मोटारसायकलसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ (19‌ रा. सुभाष चौक जुना पारधी वाडा अमळनेर असे मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे.

त्याच्या ताब्यातील मोटार सायकलबाबत अमळनेर पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्या घरझडतीत चोरीचा मुद्देमाल देखील आढळून आला. या चोरी प्रकरणी देखील अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होता. या दोन्ही गुन्ह्याप्रकरणी राजेश उर्फ दादू निकुंभ यास पुढील तपासकामी अमळनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे,कॉ. संदीप पाटील, सुरज पाटील, प्रदीप पाटील, प्रविण मांडोळे, दिपक शिंदे व परेश महाजन यांनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here