हद्दपार आरोपी चोरीच्या मोटार सायकलसह अटकेत

On: January 11, 2021 5:00 PM

जळगाव : जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला कु-हाकाकोडा ता. मुक्ताईनगर येथील संतोष विष्णू राऊळकर यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत पुढील तपासकामी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

संतोष राऊळकर यास दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्द्पार करण्यात आले आहे. तसेच तो जिल्ह्यात चोरीच्या मोटारसायकल देखील वापरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहीतीच्या आधारे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी आपल्या पथकाच्या मदतीने त्याला जेरबंद केले.

अटकेतील संतोष राऊळकर याच्या विरुद्ध नांदुरा (जिल्हा बुलढाणा) पोलिस स्टेशनला चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ. सुनील दामोदरे, प्रदीप पाटील, विजय पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील व पंकज शिंदे यांनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment