जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन 2020 – 21 च्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने येत्या 19 जानेवारी पासून सुरु होत आहेत. या परीक्षेच्या सरावासाठी मॉकटेस्ट देणे आवश्यक आहे.
बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बीएस.डब्लयू. (प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाचे सत्र-1 बॅकलॉग व रिपीटर, सत्र -3 व 5 नियमित व रिपीटर) यासह पदवी स्तरावरील व्यवस्थापनशास्त्र (बॅकलॉग व रिपीटर), फार्मसी, एम.एस.डब्लू. (सत्र प्रथम बॅकलॉग, रिपीटर, सत्र- 2, 3, 4 नियमित व बॅकलॉग), विधी (एप्रिल-2020), विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन एमसीक्यु पद्धतीने घेतल्या जातील. ऑनलाईन परीक्षेचा सराव होण्यासाठी विद्यार्थ्यांना मॉकटेस्ट बंधनकारक राहील.
विद्यार्थ्यांना https://nmu.unionline.in या संकेतस्थळावर ही मॉकटेस्ट देता येईल. काही तांत्रिक अडचण आल्यास सॉफ्टवेअरमध्ये नीड सपोर्ट या चाटबोटद्वारे त्याचे निराकारण करुन घ्यावे. तसेच महाविद्यालयात नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षा समन्वयकाशी देखील संपर्क साधावा. या परीक्षेबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.